सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मणिपूरमध्ये आणखी एक भयानक प्रकार…. महिलेला नग्न करून सामुहिक बलात्कार… पीडिता म्हणाली…

by India Darpan
ऑगस्ट 11, 2023 | 12:00 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या साडेतीन महिन्यांपासून मणिपूर राज्यांमध्ये मैतेई आणि कुकी या दोन समाजामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून मोठा हिंसाचार उसळला आहे. यामध्ये हजारो घरांची जाळपोळ झाली असून शेकडा नागरिक मारले गेले आहेत. परंतु याहीपेक्षा अत्यंत भयानक आणि अमानवीय घटना म्हणजे महिलांवरील अत्याचार होय, दोन समाजातील द्वेषातून आता महिलांचा मात्र प्रचंड शारीरिक छळ होत आहे. काही दिवसांपूर्वी दोन महिला नग्न करून धिंड काढण्यात आल्याने संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली होती. आता पुन्हा एकदा असेच एक प्रकरण समोर आले असून सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका संतप्त गटाने दुसऱ्या समाजातील एका महिलेला नग्न करून तिच्या सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.

जीव वाचवण्यासाठी ती…
मे महिन्यांपासून मणिपूरमध्ये हा जातीय हिंसाचार उफाळला आहे. मणिपूरमधून दररोज महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जातीय संघर्ष सुरू झाल्यानंतर चुरचंदपूर येथील एक ३७ वर्षीय महिलेच्या घराला एका संतप्त जमावणे आग लावली तेव्हा या आपल्या घरातून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा ती प्रयत्न करत होती. सुमारे एक किलोमीटर पळत गेल्यानंतर ती पळत असताना खाली पडली त्याच वेळी तिच्या मागे लागलेल्या कुकी समुदायाच्या एका गटाने तिला आडवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही महिला आपला जीव वाचवण्यासाठी पळत होती परंतु अविचारी आणि सैतान झालेले माणसांनी तिला अडवले. तिचे कपडे फाडले. तिला नग्न करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पिडीत महिलेने तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणी मैतेई समुदायाच्या महिलांनी मशाल मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

मारहाण करीत…
या अमानुष घटनेसंदर्शन पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, गावामध्ये एका समुदायाकडून घरांची जाळपोळ सुरू होती तो भयानक दिवस ३ मे हा होता, संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कुकी समुदायाच्या या गटाने अनेक घरांना आग लावली. यामध्ये पीडितेच्या घराचाही समावेश होता. ही जाळपोळीची घटना घडत असताना पीडितेनं आपली भाची, दोन मुले आणि वहिनींसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुमारे १ किलोमीटर अंतर धावल्यानंतर ती अडखळली आणि खाली पडली. मात्र तोपर्यंत पीडितेची वहिनी मुलांसह सुरक्षित ठिकाणी जोरात धावत गेली. पण पीडितेला पाच ते सहा हल्लेखोरांनी आडवले. ती महिला जिवाच्या कंपन्या आरडाओरडा करत होती परंतु तिचा आवाज कोणापर्यंतही पोहोचला नाही. मदतीसाठी कोणीही धावून आले नाही, तसेच तिने हल्लेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण नराधमांनी तिला मारहाण करत तिच्यावर क्रूरपणे सामुहिक बलात्कार केला. इतकेच नव्हे तर आणखी काही कुकी समुदायाचे हल्लेखोर या अत्याचारात सामील झाले. या प्रकारानंतर त्यामुळे ती महिला बेशुद्ध पडली. जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा आपल्या मैतेई समुदायाच्या घरात होती, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Manipur Crime Women Naked Gang Rape Kuki mob
Violence Northeast

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यातील संतापजनक घटना… पत्नीला विवस्त्र करुन नाचायला लावले… व्हिडिओही बनवला…

Next Post

पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील मसाज सेंटरवर पोलिसांची धाड… बिदनिक्कतपणे सुरू होता वेश्या व्यवसाय…

India Darpan

Next Post
download 89

पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील मसाज सेंटरवर पोलिसांची धाड... बिदनिक्कतपणे सुरू होता वेश्या व्यवसाय...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011