इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मेईतेई समुदायाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबत निदर्शने सुरू आहेत. सदर आंदोलन हे पेटल्यानंतर राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता मणिपूरमध्ये पुन्हा एकदा रात्री हिंसाचार उसळला असल्याने राज्यातील दोन जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा मुष्टीयोद्धा मेरी कॉम हिने ट्विट करून पंतप्रधान मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे, माझे राज्य जळत असून केंद्र सरकारने मदत करावी, असे आवाहन तिने केले आहे.
मणिपूर हे भारत देशेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मणिपूरच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिणेस मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये तर पूर्वेस म्यानमार हा देश आहे. इंफाळ ही मणिपूरची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर असून येथे त्याचा प्रभाव जाणवत आहे. बिष्णुपूर आणि चुरचंदपूरमध्ये या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंसाचार घडल्याने पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याबरोबरच दोन्ही जिल्ह्यात कलम जमावबंदी लागू करण्यात आले आहे.
तसेच राज्यातील इतर भागात शांतता राखण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे करण्यात आले असल्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जमावबंदी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये ककचिंग, जिरिबाम, थौबल, इंफाळ पश्चिम आणि बिष्णुपूर आणि आदिवासीबहुल चुराचंदपूर, कांगपोकपी आणि टेंगनौपाल या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मणिपूरमध्ये जाळपोळ सुरू असल्याने भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉमने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. तसेच या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूरमधील जाळपोळ, हिंसाचाराचे काही फोटो शेअर केले आहेत. मणिपूरमध्ये लष्कर आणि सशस्त्र दलांच्या मदतीने हिंसाचार आटोक्यात आणण्यात आला.विविध जिल्ह्यांतील लष्कर, सशस्त्र दल आणि राज्य सरकारच्या आवारात सुमारे चार हजार ग्रामस्थांना आश्रय देण्यात आला. त्याचवेळी आंदोलन नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस, निमलष्करी दल व लष्कराच्या वतीने ध्वज संचलन करण्यात येत आहे.
My state Manipur is burning, kindly help @narendramodi @PMOIndia @AmitShah @rajnathsingh @republic @ndtv @IndiaToday pic.twitter.com/VMdmYMoKqP
— M C Mary Kom OLY (@MangteC) May 3, 2023
Manipur Burning Mary Kom PM Modi HM Shah