इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कृषीमंत्री माणिकराव ठाकरे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदल करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आता समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आज सकाळी बैठक झाली. त्यात मंत्रीपद काढून घेण्यापेक्षा खांदेपालटाचा पर्यायावर चर्चा झाली.
रमी प्रकरणावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून त्यावर सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. त्यात आता माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद जाणार की खाते बदलणार यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. कृषीखातं आता अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले दत्तात्रय भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर कोकाटे यांना क्रीडा किंवा मदत पुनवर्सन मंत्रालयाचा कारभार देण्याची शक्यता आहे.
याअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुध्दा इजा झाला, बिजा झाला म्हणत कारवाईचे संकेत दिले होते. रमीच्या वादावर माणिकराव कोकाटेंशी बोलून येत्या सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आता गुरुवारी या विषयांवर अंतिम बैठक झाली. त्यात कोकाटे यांना अभय देण्यात आले. पण, त्यांचे खाते बदलण्यात आले.
तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी काही दिवसापूर्वी माणिकराव कोकाटे घरी बसवलं पाहिजे अशी मागणी केली होती.