इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विधिमंडळ चौकशीचा अहवाल जर म्हणत असेल की तब्बल १८ ते २२ मिनिटं, कोकाटे पत्ते खेळत होते, तर हे खुपचं गंभीर आहे. ह्यावर जर अजित पवार कारवाई करणार नसतील तर त्यांच्यावर विरोधी पक्षाने हा विषय लावून धरला पाहिजे.