इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यात एक बैठक झाली. यात कृषीमंत्री माणिकराव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली. त्यात मंत्रीपद काढून घेण्यापेक्षा खांदेपालटाचा पर्यायावर चर्चा झाली. पण, आता सोमवारी माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा राजीनामा जवळपास निश्चित असल्याचेही बोलले जात आहे.
रमी प्रकरणावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून त्यावर सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. त्यात आता काय निर्णय होतो हे महत्वाचे आहे. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद जाणार की खाते बदलणार? यावरच आता चर्चा असतांनाच आता राजीनामा ते देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुध्दा इजा झाला, बिजा झाला म्हणत कारवाईचे संकेत दिले आहे. रमीच्या वादावर माणिकराव कोकाटेंशी बोलून येत्या सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी? त्यांना आता मदत आणि पुनर्वसन मंत्री करण्यात येणार आहे असं माध्यमांमध्ये दाखवलं जातय. कोकटेंना एकाच प्रश्न, हे खाते पण ओसाड गावची पाटीलकी आहे का? खरतर या माणसाला घरी बसवलं पाहिजे. हे या मदत आणि पुनर्वसन खात्यात काय दिवे लावणार असा प्रश्न केला आहे.
एकुणच या सर्व घडामोडींवर माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.