वैभव शिंगणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन आज नाशिकच्या रामकुंडावर झाले. नाशिकमधील भानोसे कुटुंबिय हे त्यांचे पुरोहित आहेत. आज सकाळी झालेल्या अस्थी विसर्जन विधीचे पौरोहित्य शांताराम भानोसे, मकरंद भानोसे, सुरेश भानोसे, चंद्रकांत भानोसे यांनी केले. याप्रसंगी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल तसेच प्रतिक शुक्ल, अविनाश, दीक्षित, शेखर शुक्ल, दिनेश गायधनी, विनायक गायधनी हे सुद्धा उपस्थित होते. मंगेशकर कुटुंबियांच्या किमान सहा पिढ्यांची वंशावळ सध्या भानोसे कुटुंबियांकडे आहे. भानोसे कुटुंबिय हे मूळचे नाशिकचे आहेत. रविवार कारंजा आणि गायधनी लेनमध्ये ते राहतात. आजच्या अस्थी विसर्जन विधीनंतर भानोसे यांनी मंगेशकर कुटुंबियांना त्यांची वंशावळही दाखवली. याप्रसंगी लता दिदींचे भाचे आदिनाथ हृदयनाथ मंगेशकर, भाचे सून कृष्णा मंगेशकर, भाची राधा मंगेशकर, बहिण उषा मंगेशकर, भाचे योगेश खाडीकर, मयूरेश पै आदी उपस्थित होते. यापूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर हे त्यांच्या मातोश्रींच्या अस्थी घेऊन नाशिकला आले होते. त्यावेळीही भानोसे कुटुंबियांनी सर्व विधी केला होता. त्याप्रसंगीच्या आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात आला. यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत मकरंद मधुसुदन भानोसे