नाशिक – जैन श्वेतांबर स्थानकवासी श्री संघ, आर. के. नाशिक या देशभर जैन समाजात नावलौकिक असलेल्या संस्थेच्या नवनिर्वाचित विश्वस्तांची आज शनिवारी दुपारी ३ वाजता आर के जैन स्थानक या ठिकाणी निवडणूक अधिकारी अनिल बाफना यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन पुढील प्रमाणे पदाधिकारी आगामी तीन वर्षां करिता एकमताने निवडण्यात आले. यावेळी अध्यक्षपदी मंगलचंद साखला (संघपती ), उपाध्यक्षपदी मोहनलाल ब्रम्हेचा, प्रशासन सेक्रेटरीपदी जव्हेरीलाल भंडारी (जे.सी), धार्मिक सेक्रेटरीपदी विनोद (बिट्टू ) बेदमुथा, प्रशासन सह सेक्रेटरीपदी रविंद्र चोपडा, धार्मिक सह सेक्रेटरीपदी विजय ओस्तवाल तर कोषाध्यक्षपदी ललित मोदी यांची निवड करण्यात आली आहे.रविवार २२ मे रोजी जय जिनेन्द्र पॅनल व जय महावीर पॅनल यांच्यात अटीतटीचा सामना होऊन जय जिनेन्द्र पॅनलचे २५ उमेदवार तर जय महावीर पॅनलचे ८ उमेदवार विजयी झाले होते. त्यातून आज रोजी झालेल्या सभेत जय जिनेन्द्र पॅनलच्या वरील प्रमाणे सदस्यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली . यावेळी मोठ्या संख्येने हितचिंतक व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.