इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदीप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडीतील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील एकमेव आहे. या मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्यातील श्री रामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे. गडकिल्ल्यांच्या धर्तीवरील देशातील विविध मंदिरांच्या शैलींचा प्रभाव असलेल्या या मंदिराचे क्षेत्रफळ अडीच हजार चौरस फूट इतके आहे. तर या भव्य मंदिराची तटबंदी पाच हजार चौरस फूट इतकी आहे. हे भव्य दिव्य मंदिर चार एकर जमिनीवर विस्तारलेले आहे. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1901598639115653152