नाशिक – मंदिरे उघडण्यासाठी सोमवारी भाजपचे राज्यव्यापी शंखनाद आंदोलन राज्यात सर्व ठिकाणी केले. नाशिकमध्ये सकाळी रामकुंड येथे हे आंदोलन भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात साधु, महंत, वारकरी हे सहभागी झाले होते. राज्यात सर्व काही अनलॉक होत असतांना मंदिर मात्र अजूनही भाविकांना दर्शनासाठी बंद आहेत. एकीकडे सर्व दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, वाईन शॉप खुली झालेली आहे, पण, राज्यभरातली मंदिर मात्र अद्याप कुलूपबंद आहेत. त्यामुळे मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. राज्यात ठिकठिकाणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी हे शंखनाद आंदोलन करण्यात आले. याअगोदरही पहिल्या लाटेत मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. आता दुस-या लाटेत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे.