लखनऊ (उत्तर प्रदेश) – भारतीय लोकशाहीत न्यायमंडळ यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात तसेच इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियमांचे उल्लंघन केल्यास तात्काळ शिक्षा होते. त्यामुळे या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. परंतु न्यायालयाची बेअदबी किंवा अपमान झाल्यास तात्काळ अटक देखील होऊ शकते. अशीच घटना मेरठ मध्ये घडली.
मेरठमधील एका डेपोमध्ये तैनात असलेल्या चालकाने आपल्या बॉसला रजेचा पुरावा देण्यासाठी एक फोटो काढला. मात्र, न्यायालयीन सुनावणीच्या तारखेला जाण्यासाठी त्याने त्याच्या बॉसकडून रजा मागितली. मात्र बॉसने त्यासाठी पुरावे मागितले. त्यामुळे त्याने पुरावा देण्यासाठी न्यायालयाच्या आतील भागातला सेल्फी काढून तो फोटो पाठवला. तेवढ्यात न्यायालयातील सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले. त्याचा मोबाईल जप्त करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, एक चालक शुक्रवारी सकाळी सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचला. तेव्हा त्याने बॉसला पुरावा देण्यासाठी मोबाईलमध्ये फोटो क्लिक केला. असे करत असताना त्याला पकडण्यात आले. आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे. त्याचा मोबाईलही काढून घेतला. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे.