नवी दिल्ली – आजच्या काळात कोणतीही गोष्ट खरेदी करणे अशक्य किंवा अवघड नाही. परंतु तिचा सांभाळ करणे किंवा जोपासना करणे अत्यंत कठीण काम बनले आहे. मोबाईल बाबतची ही गोष्ट लागू होते. कारण अत्यंत महागडे आणि अत्याधुनिक मोबाइल खरेदी करणे ही सोपी गोष्ट झाली आहे. परंतु त्याचा सांभाळ करणे किंवा त्याची निगा राखणे ही अत्यंत कठीण गोष्ट वाटते.
आजच्या काळात स्मार्टफोन सुरक्षित ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांना चांगलेच माहीत आहे! आपण हातात आयफोन धरतो, तेव्हा तो जमिनीवर पडण्याच्या किंवा ओरखड्याची भिती लागते. पण कुणी आयफोनवर चक्क गरम लाव्हा रस ओतला गेला तर काय होईल? कारण वॉव एक्सपिरिमेंटचा एक व्हिडिओ युट्युबवर आला आहे, त्यामध्ये एक व्यक्ती नवीन आयफोन 12 वर गरम लाव्हा टाकताना दिसत आहे. उकळत्या लाव्हा ओतल्यानंतर आयफोनचे काय झाले असेल?
व्हिडिओची सुरुवात एका माणसाने त्याच्या बॉक्समधून आयफोन 12 काढली आणि त्याच वेळी लाव्हा गरम केला. तो होल्डरद्वारे उचलतो आणि टेबलवर ठेवलेल्या आयफोन 12 च्या स्क्रीनवर ओततो. काही काळासाठी लाव्हा स्क्रीनवर पसरून गरम फोम तयार होतो, नंतर हळूहळू तो स्क्रीनवर स्थिर होतो. त्यानंतर आयफोनच्या स्क्रीनवर एक काळा डाग दिसू लागतो. आणि पुन्हा त्याच्यावर गरम लावा ओततो.
काय आश्चर्य घडते. आयफोनची स्क्रीन लाव्हामुळे इतक्या उष्णतेनंतरही क्रॅक होत नाही. प्रत्यक्षात सत्य काहीतरी वेगळे आहे. कारण जेव्हा आपण व्हिडिओ बारकाईने पाहिला, तेव्हा आपल्याला आढळते की, गरम लाव्हा ओतण्यासाठी वापरलेला स्मार्टफोन हा मूळ आयफोन 12 नसून त्याचा क्लोन आहे. काळजीपूर्वक पाहील्यास दिसते की, तो बॉक्समधून आणलेला स्मार्टफोन प्रयोगासाठी वापरलेल्या स्मार्टफोनपेक्षा अगदी वेगळा आहे.
कोणत्याही स्मार्टफोनवर गरम लावा ओतताना आपण हीच अपेक्षा करू शकतो. की तो खराब होईल, पण, आयफोनच्या डुप्लीकेट फोनच्या व्हिडिओने अनपेक्षित परिणामाने प्रेक्षकांना नक्कीच थक्क केले. एवढ्या उच्च तापमानाचा सामना करूनही स्फोट न झालेला स्मार्टफोन कोणता असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण , त्या फोनचे नाव किंवा सूची कुठेही सापडली नाही. त्यामुळे असे कधीही करू नका! कारण असे केल्या त्यामुळे घरात, अंगणात, किंवा अपार्टमेंटला आग लागू शकते तसेच त्याच्या बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.