इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज विधानसभेत आज अपराजिता विधेयक म्हणजेच अँटी रेप विधेयक मंजूर केले. आता राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राज्यात अँटी रेप कायदा लागू होईल. या अँटी रेप बिलास अपराजिता महिला व बाल विधेयक २०२४ असे नाव देण्यात आल आहे. राज्य सरकारने हे विधेयक मंजूर करण्यासाठी २ सप्टेंबरपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवले होते. या नव्या कायद्यानुसार ३६ दिवसांत बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे. तर, पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास १० दिवसांता दोषींना फाशी देण्याची तरतूद आहे.
कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालायात ८ ऑगस्ट रोजी येथील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्यानंतर राज्यात कडक कायदा लागू करण्याची मागणी केली होती. बलात्काऱ्यांना तात्काळ फाशी देण्याची मागणी पीडित कुटुंब व महिला वर्गाकडून केली जात होती. या सर्व घटनांची दखल घेत पश्चिम बंगाल सरकारने बलात्कार विरोधी विधेयक सादर केले.
पश्चिम बंगालच्या विधानसभेत, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या मी माझ्या सर्व बंधू-भगिनींचे आभार मानू इच्छिते आणि म्हणू इच्छिते की मी दररोज मुलींच्या हक्कांच्या रक्षणासाठी लढा देईन… ही इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची आणि लढण्याची बाब आहे. मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी… ४३ वर्षांपूर्वी या दिवशी १९८१ मध्ये, महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ‘कन्व्हेंशन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स भेदभाव अगेन्स्ट वुमन’ साठी एक समिती स्थापन केली… मी सर्वांचे अभिनंदन करतो. नागरी समाजापासून ते महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत.