केंद्रात सत्तेत असलेल्या बलाढ्य भाजपला चारीमुंड्या चीत करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या सध्या विशेष चर्चेत आहेत. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत. पश्चिम बंगालमधील निर्विवाद विजयानंतर त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा हा वेध….
बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांची राज्यातली स्थिती आणखी मजबूत झाली असून राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधातील अन्य विरोधकांची एकजुट करण्यास त्यांची मदत होईल. सिंगूर आणि नंदीग्रामच्या रस्त्यावर हजारो शेतकऱ्यांचे आठ वर्षे नेतृत्व करण्याबरोबर ६६ वर्षीय ममता बॅनर्जी यांनी एक दशकांहून अधिक काळ प. बंगालवर अखंड राज्य केले.
२०१९ मध्ये पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत भाजपाने १८ जागा जिंकल्या तेव्हा ममता दिदी यांच्या राजवटीला आव्हान देण्यात आले. त्यापूर्वी २००७ मध्ये डाव्या आघाडीच्या सरकारविरोधात त्यांची राजकीय युद्ध सुरू केले. नंदीग्राम आणि सिंगूरमधील संतप्त लोकांचे नेतृत्व करण्यासाठी ममता बॅनर्जी त्यांच्या राजकीय प्रवासाला एक वेगवान गती मिळाली. यानंतर त्यांची राजकीय वाढत गेली. ममता यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात कॉंग्रेस स्वयंसेवक म्हणून केली. कसा आहे ममता बॅनर्जी यांचा राजकीय यशोप्रवास थक्क करणाराच आहे.
बॅनर्जी यांनी शालेय काळात कॉंग्रेस स्वयंसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. यूपीए आणि एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाल्या हा त्यांचा राजकीय चमत्कार होता. त्यापूर्वी राज्यात औद्योगिकीकरणासाठी शेतकर्यांकडून ‘सक्तीने’ भूसंपादनाच्या मुद्यावरुन त्यांनी नंदीग्राम आणि सिंगूरमधील कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात उभे राहून आंदोलनांचे नेतृत्व केले. या आंदोलनामुळे त्यांचे राजकीय भवितव्य बदलले आणि तृणमूल कॉंग्रेस एक मजबूत पक्ष म्हणून उदयास आला.
कॉंग्रेसपासून विभक्त झाल्यानंतर बॅनर्जी यांनी जानेवारी १९९८ मध्ये तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली आणि त्यांचा पक्ष प. बंगाल राज्यात कम्युनिस्ट राजवटीविरूद्ध लढत गेला. पक्षाच्या स्थापनेनंतर २००१ मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या तेव्हा तृणमूल कॉंग्रेसने २९४ सदस्यांच्या विधानसभेत ६० जागा जिंकल्या आणि डाव्या आघाडीला १९२ जागा मिळाल्या. त्याच वेळी २००६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसची आमदार संख्या निम्म्यावर आली आणि त्याने केवळ ३० जागा जिंकल्या, तर डाव्या आघाडीने २१९ जागा जिंकल्या.
दरम्यान, २०११ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदविला आणि राज्यात ३४ वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारचा त्यांनी पराभव केला. त्यांच्या पक्षाने १८४ जागा जिंकल्या, तर कम्युनिस्ट ६० जागांवर घसरले. त्यावेळी डाव्या आघाडीचे सरकार जगातील सर्वाधिक प्रदीर्घ निवडणूकीचे सरकार होते.
बॅनर्जी यांनी २०१६ मध्येही आपल्या पक्षाला प्रचंड विजय मिळवून दिला आणि तृणमूल कॉंग्रेसने २११ जागा जिंकल्या. यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बॅनर्जी यांना मोठा झटका बसला कारण त्यांचे विश्वासू सहकारी सुवेन्दु अधिकारी आणि पक्षाचे अनेक नेते भाजपामध्ये दाखल झाले.
बॅनर्जींनी अखेर पक्षाच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी करूनही यंदा तिसऱ्यादा आपल्या पक्षाला दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत भाजपाने तृणमूल कॉंग्रेसला सत्तेवरून हटविसाठी सर्व ताकद पणाला लावली, परंतु बॅनर्जी या भाजपच्या निवडणूक युद्धाच्या तंत्राला पराभूत करणाऱ्या सेनापती ठरल्या. त्या १९९६, १९९८, १९९९, २००४, आणि २०१९ मध्ये कोलकाता दक्षिण मतदार संघातून लोकसभेच्या सदस्याही राहिल्या आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!