सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव बस स्थानकाला पावसामुळे तळ्याच स्वरुप आले असून ठिकठिकाणी खड्डे आहे. नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे बस स्थानक असलेल्या या बस स्थानकातून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांची रोज ये-जा होत असते. मात्र बस स्थानक आवारत खड्डे पडलेले असल्याने पाऊस झाला की त्यात पाणी साचून बस स्थानकाला तळ्याच स्वरुप प्रप्त होते. अशाच पाण्यातून वाहकाला बस काढण्याची वेळ येते. पाण्यामुळे अनेकवेळेस खड्डे समजत नसल्याने बस मधील प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मुसळधार पाऊस झाला की यापेक्षा जास्त पाणी साचते. त्यामुळे बसस्थआनकात जाण्यासाठी रस्ता सुध्दा शोधण्याची वेळ येते. त्यामुळे बस स्थानकाच्या आवारातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आता शहरातील नागरिकांकडून होत आहे.