अजय सोनवणे
आशिया कप स्पर्धेसाठी मालेगावच्या वकार अंजुम व जाहिद सैफी दोघा शुटींगपटूंनी भारतीय संघात स्थान मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिल्लीत होणा-या आशिया कप स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. वकार अंजूम व जाहिद सैफी यांच्या भारतीय संघात निवड झाल्याने मालेगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. ढोल- ताश्याच्या गजरात दोघांची उघड्या जीपमधून देशभक्तीपर गितांची धून वाजवत मिरवणूक काढण्यात आली. आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते. दोघा खेळाडुंचा गौरव करत स्पर्धेत चांगली कामगिरी करुन देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. वकार अंजूम व जाहिद यांनी चांगली कामगिरीची करीत आशिया कपवर भारताचे नाव करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.