मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे काही दिवसांपुर्वी अवैधरित्या आलेले उंट तालुका पोलिसांनी जप्त करत त्यांची रवानगी गोशाळेत केली होती. त्यांची तेथे वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यात एका उंटाचा मृत्यू तर एका उंटाला पिल्लू झाले होते. या सर्व उंटाचे टॅगिंग करण्यात येऊन अखेर या ४२ उंटाना रायकाच्या माध्यमातून आज मालेगाव मधून पुन्हा राजस्थानकडे पाठविण्यात आले.