मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य प्रदेशाच्या सीहोर कुबेरेश्वर धाम येथे सुरू असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत मालेगावच्या महिलेचा मृत्यू. मंगला कांडेकर असे या महिलेचे आहे नाव असून त्या मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील रहिवासी आहेत. गर्दीत भोवळ येऊन आल्याने त्यांचा मृत्यू झाला. रुद्राक्ष घेण्यासाठी मालेगावातून हजारोच्या संख्येने भाविक कुबेरेश्वर धामला गेले आहेत.