मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावचे अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांची नाशिक येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली. बुधवारी त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी ग्रामिण पोलिस कर्मचा-यांनी अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालया पासून घोडागाडीतून फुलांचा वर्षाव करीत वाजत गाजत शानदार मिरवणूक काढली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी तसेच मालेगाव शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.