मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भर वस्तीत आलेल्या सटाणा नाका भागातील कलंत्री गॅस एजन्सीमध्ये तोंडाला रुमाल बांधून घुसलेल्या दोन अज्ञात चोरांनी कर्मचाऱ्यांना पिस्टल व चाकू दाखवत १ लाखांची रोकड घेवून पोबारा केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चोरीचा हा सर्व थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. काल सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान पाऊस चालू असताना हे युवक मोटार सायकल आले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटिव्हीच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे.