मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सर्वांनाच आदर आहे. काही शिवप्रेमी तर शिवरायांच्या प्रेमापोटी नानाविध बाबी करतात. मालेगावच्या एका शिवप्रेमीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कारण, त्याने त्याचे घर हे चक्क किल्लाच बनविले आहे.
मालेगाव येथील भायगाव येथे राहणारे शिवप्रेमी संतोष पाटील यांनी चक्क आपले घर एका किल्ल्याच्या स्वरुपात बनविले आहे. घराबाहेर दोन बुरुज बनवत त्यावर आर्टिफिशल तोफा त्यांनी ठेवल्या आहेत. त्यानंतर घरात प्रवेश करताच छत्रपती शिवाजी माहाराजाचे दर्शन व्हावे यासाठी त्यांची प्रतिमा लावली आहे. या घरातील गडकिल्यांचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
संपूर्ण घरातील वातावरण शिवकालीन ठेवण्याचा प्रयत्न शिवप्रेमी संतोष पाटील यांनी केल्याने सध्या त्यांचे किल्ला स्वरुपात बांधलेले घर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्याला हवे तसे घर बनविण्याचा प्रयत्न करत असते. पण, संतोष पाटील यांनी मात्र वेगळं करत हे घर बांधले आहे.
Malegaon Youth Home Fort Design