मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज येथील कॉलेज ग्राऊंडवर सभा होत आहे. उद्धव यांचे व्यासपीठावर आगमन झाले आहे. आज ते काय बोलणार, मालेगाव बाह्यचे आमदार आणि शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचा कसा समाचार घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना हे नाव आणि पक्ष शिंदे गटाला गेल्यानंतर ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या खेड येथे पहिली सभा घेतली. त्यानंतर आता दुसरी सभा मालेगावात होत आहे. शिंदे-फडणीव सरकारमधील मंत्री दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार आहेत. आणि आता उद्धव यांची येथे सभा होत आहे. या सभेसाठी मालेगावात उर्दू होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची राज्यभर चर्चा होत आहे.
बघा, या सभेचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1639983443055370243?s=20
हिरेंचेही जोरदार शक्तीप्रदर्शन
भाजपला सोडचिठ्ठी देत अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. एकेकाळी मालेगाव हा हिरे घराण्याचा बालेकिल्ला होता. याच बालेकिल्ल्याला दादा भुसे यांनी सुरूंग लावला. आणि आता याच भुसेंना आस्मान दाखविण्यासाठी हिरेंनी चंग बांधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने हिरे हे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आहेत. त्यामुळे मालेगावात हिरे कमबॅक करणार का, अशी चर्चा रंगत आहे.
Malegaon Uddhav Thackeray Sabha Live Telecast