अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरात आज धक्कादायक प्रकार घ़डला आहे. सोयगाव परिसरात राहणारे गिट्टी कारखान्याचे मालक दिनेश रुंग्ठा हे दरेगाव येथील आपल्या कारखान्यात आले असता त्यांच्या जवळ असलेल्या बँगेमधील ५० हजार रुपयांची बॅग चौघा तरुणांनी हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यास विरोध केल्यांतर त्याच वेळी अन्य काही नागरिक तेथे जमले त्यांनी त्यास विरोध केला. यावेळी झटापट झाली त्यामुळे लुटीसाठी आलेल्या चौघां पैकी एकाने गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. गोळीबारानंतर चौघे पळून जात असतांना जमलेल्या नागरीकांनी एकाचा पाठलाग करीत त्यात एकास पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा व जीवंत काडतूस जप्त केले. या घटनेत चोरांना पकडण्यासाठी धावणा-या एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्यासह पोलिसांच पथके घटनास्थळी पोहचले आणि परडलेल्या एकास ताब्यात घेतले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.