मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे करिअर गाईडन्स नावाखाली विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण, धर्म परिवर्तनाचे धडे जात असल्याचा आरोप करीत हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यक्रमस्थळी गदारोळ घातला. दरम्यान गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई केल्याने संतप्त पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस स्थानकात दाखल होत पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
मालेगावच्या एमएसजी महाविद्यालयात पुण्याच्या सत्य मलिक लोक सेवा ग्रुपतर्फे भारतीय छात्र व विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख व्याख्यात्यांनी प्रथम कुराणमधील कलमा पढवत इतर धर्मीय मुलांनाही मुस्लिमाप्रमाणे शिक्षण करण्याचे आमिष दाखवून धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यक्रमस्थळी दाखल होत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मालेगावमध्ये तणाव निर्माण झाला होता.
याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले. मात्र पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला. महाविद्यालय प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या पालकमंत्री दादा भुसे यांनी थेट कॅम्प पोलिस स्थानक गाठत ठाण मांडले. त्यानंतर त्यांनी पोलिस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधत सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान पोलिस स्थानाकासमोर मोठा जमाव जमला होता. या प्रकाराची दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालयाचे प्राचार्यांना तडकाफडकी निलंबित केले. दरम्यान दादा भुसे यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांचे जाब जबाब नोंदवित कार्यक्रमाचे आयोजक, व्याख्याते व महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल केला.
Malegaon Student Religious Education Tense