अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे आज उत्तर महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर असतांना रात्री उशिरा त्यांचे मालेगावमध्ये आगमन झाले. उशीर झाल्याने वेळे अभावी आदित्य ठाकरेंना मालेगावमधील शिवसंवाद यात्रा आटोपती घ्यावी लागली. शिवसंवाद यात्रेनिमित्त मालेगावमध्ये यायला आदित्य ठाकरे यांना यायला उशीर झाला. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात त्यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. यावेळी बोलताना त्यांनी ज्यांच्यावर प्रेम केले, ज्यांच्या सभेसाठी आलो, रोड शो केले आणि विशेष म्हणजे ज्यांनी घरी येऊन अन्न खाल्ले गद्दारी करणार नाही असे सांगितले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला अशी टीका नाव न घेता मंत्री दादा भुसे यांच्यावर केली.