मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा प्रश्नावर शेतकरी संघटनेने मालेगाव येथील टेहरे चौफुली येथे आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर कांदा टाकत शेतक-यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर तिरडी काढून निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे मुंबई- आग्रा महामार्गावरील टेहरे चौफुलीवर वाहतूक काही काळ ठप्प झाली. गेल्या काही दिवसात कांद्याचे भावात प्रचंड घसरण झाली असून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संतप्त आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने सरकारचे कांद्याच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले.