मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात आज सर्वत्र सर्वच शाळा उघडल्यानंतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. पण, मालेगाव तालूक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना चक्क आमरस-पुरणपोळीची मेजवणी देण्यात आली. त्याबरोबरच त्यांचे स्वागतही जोरदार करण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून शाळा सुरु झाल्या की विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ठिकठिकाणी केले जातात. त्यात कधी बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक तर बँण्डच्या तालावर स्वागत केले जाते. पण, मालेगाव तालुक्यातील टाकळी येथे चक्क आमरस – पुरणपोळीची मेजवाणी देत जरा हटके उपक्रम केला.
या मेजवाणीवर विद्यार्थ्यांही खुश झाले. सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी कंटाळा करतात. त्यामुळे त्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी त्यांचे पहिल्या दिवशी स्वागत करण्याचा उपक्रम सुरु झाला. त्यात टाकळीच्या शाळेने वेगळा उपक्रम केला. त्यामुळे ही शाळा चांगलीची चर्चेत आहे.