मालेगाव – येथील राजकारणात पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहेत. काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता समाजवादी पक्षही येथे खिळखिळा होत आहे. समाजवादी पक्षाचे मालेगाव शहराध्यक्ष शरीफ हुसैन मन्सूरी, साजीद मोहम्मद शफी शेख, नफीस अहमद सिराज अहमद, सय्यद जहीर सय्यद सलीम आदींनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांचे स्वागत केले. मालेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढण्याच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश फायदेशीर ठरेल, असे नवाब मलिक म्हणाले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी प्रदेश सरचिटणीस मा. शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस मा. मुस्ताक अहमद आणि मालेगाव मधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
https://twitter.com/NCPspeaks/status/1453641283482783747