मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील आघार-ढवळेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पित्याने आपल्या सहा वर्षांच्या चिमुरड्यासह विहीरीत जीव दिला आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पित्याने हे असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत लक्ष्मण हिरे असे या पित्याचे नाव आहे. हिरे यांनी आपल्या सहा वर्षीय मुलाला सोबत घेत अंजग येथील शेती महामंडळाच्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. यशवंत हिरे हे पशु खाद्य विक्रीचा व्यवसाय करत होते.
गुरुवारी ते मुलाला सोबत घेऊन निघाले. अंजग येथे त्यांनी आपली पिकअप वाहन उभे केले. त्यानंतर अनेक तास गाडी उभी असल्याने परिसरातील स्थानिकांना संशय आला. त्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता ही घटना उघडकीस आली. वडनेर-खकुर्डी पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी अग्निशामक दलातील जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी वडनेर-खकुर्डी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
⛔ *मणप्पुरम फायनान्सच्या एमडीवर ईडीची मोठी कारवाई*
तब्बल १४३ कोटींची मालमत्ता जप्त
https://t.co/HWQPID2p87 #indiadarpanlive #ed #seized #143crore #property #seized #manappuram #finance #md— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 5, 2023
? *MPSCसाठी राज्य सरकारने काढला हा महत्त्वाचा अध्यादेश*
https://t.co/72we92dpcf#indiadarpanlive #mpsc #state #government #order #subject #expert— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 5, 2023
Malegaon Rural Father Son Suicide Crime Police