मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावच्या बोरी अंबेदरी प्रकल्पाचा वाद चिघळला असून असून एकीकडे बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात प्रकल्पग्रस्त महिनाभरापासून आंदोलनास बसले आता. आता प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी झोडगेसह माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांनी आज गाव बंद ठेवत मुंबई – आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर पालकमंत्री दादा भुसे यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थांशी संपर्क साधत लवकरच प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी अर्धा तासानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी संतप्त आंदोलकांनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळे जाळण्याचे प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच पुतळा ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला ..