नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे शेतकऱ्यांनी मालेगाव – सुरत रस्त्यावर दाभाडी येथे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. सतत होत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पीकविमा ऑनलाइन सह ऑफलाईन करावा, पिकांचे पंचनामे त्वरीत करावे, ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच महावितरणच्या मनमानी कारभारामुळे दाभाडी ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यात सुधारणा करावी आशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह सर्व पक्षाचे पदाधिकारी या रास्ता रोको मध्ये सहभागी झाले होते.