मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केशरी शिधापत्रिकेवर धान्य मिळावे या प्रमुख मागणीसाठी नाशिकच्या मालेगावमध्ये माजी आमदार रशीद शेख, माजी आमदार आसिफ शेख व माजी महापौर ताहेरा शेख त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महिलांचा मोर्चा काढण्यात आला.
राज्यात विविध शहर व ग्रामिण भागात केशरी शिधापत्रिकेवर धान्य मिळते. मात्र मालेगावमध्ये मात्र दोन लाख शिधापत्रिका धारक धान्यापासून वंचित असून त्यांना त्वरित धान्य मिळावे तसेच साखर ,तेल डाळ मिळावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शहरातील म्युनिसिपल शाळेजवळून सुरू झालेल्या मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.