मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरातील दोन पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह कुटूंबातील काही सदस्य आणि इतर ३२ जणांवर फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्वय हिरे यांचा उध्दव ठाकरे गटात प्रवेश आणि उपनेते पद मिळाल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती मध्ये नोकरी लावून देण्याच्या प्रकरणावरुन गेल्या आठवड्यात फसवणूक झालेल्या तरुणांनी आंदोलन केले होते. याच प्रकरणात सटाणा येथील राजेंद्र गांगुर्डे यांनी अद्वय हिरे आणि त्यांचे निकटवर्तीय लकी खैरनार यांच्यासह ४ जणांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. या प्रकरणात मालेगाव कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तर दुसरीकडे रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यामध्ये सुमारे ३२ कोटींची जिल्हा बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकारी यांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने हिरे कुटुंबियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयाशनगर पोलीस स्टेशन या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे
Malegaon Politics Leader Advay Hire 2 FIR Booked