मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहान मुलांना सांभाळणे आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे अतिशय अवघड असते. अगदी क्षणाचेही दुर्लक्ष झाले तर होत्याचे नव्हते होते. अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरात घडली आहे. खेळता खेळता अडीच वर्षांचा चिमुकाल थेट उकळत्या दुधाच्या कढईत पडला. त्यातच त्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
मोहम्मद जियान मोहम्मद इरफान रा. मालेगाव असे मयत मुलाचे नाव आहे. हा चिमुकला मूळचा मालेगावचा असून तो मामाच्या गावी आईबरोबर पैठणला आला होता. पैठण येथे नेहरु चौक परिसरातील सजंरपुरा येथील अब्बु शमी कट्यारे यांच्या घरी ही दुर्दैवी घटना घडली आहे. मालेगाव येथील विवाहित मुलगी माहेरी आली होती. चिमुकला मोहम्मद हा घरात खेळत होते. घरातील अन्य व्यक्ती त्यांच्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी मोहम्मद हा खेळता खेळता दुधाच्या कढईजवळ आला. त्याला काही समजण्याच्या आत तो त्या कढईमध्ये पडला.
कढईतील दुध उकळले होते. त्यामुळे मोहम्मद हा अतिशय गंभीररित्या भाजला. कुटुंबियांनी तातडीने मोहम्मदला दुधातून बाहेर काढले आणि छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. २८ ऑगस्टपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. पैठण पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
A two and a half year old boy of Malegaon fell into a pan of boiling milk and died
Malegaon Paithan Small Child Death Boiling Milk Crime