मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील मोसम नदीवर ५० वर्षापूर्वीच्या मोसम पुलाचे तोडकामास सुरुवात झाली आहे. शहरातील सर्वात जुना पूल म्हणून त्याची ओळख होती. हा पूल जमीनदोस्त करत त्या जागी नवीन प्रशस्त असा नव्याने साडेआठ मीटर रुंद व ९० मीटर लांबी असलेला सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाचा नवीन पूल त्या जागी बांधण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे पुलाची उंची वाढविण्यात येणार आहे. सध्या पुलाचे तोडकाम सुरु झाल्याने नदी पात्रातील दुस-या पुलावरुन वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
malegaon Old Mosam Bridge Destroy