मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी कोरोना काळात अनेक गाड्याची खरेदी केली होती. मात्र महापालिकेने कचरा संकलनाचे काम खासगी वॉटरग्रेस या कंपनीला दिले. कचरा संकलन करतांना ठेकेदाराकडून वजन करताना त्यात घोटाळा होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी झाल्या होत्या. अखेर अॅक्शन मोडवर उतरलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक महापालिकेच्या गॅरेज विभागाला भेट दिली. यावेळी नवीन गाड्या धूळ खात पडल्याचे निदर्शनास आले तर कचरा संकलन झाल्यावर वजन काट्यावर अफरताफरी होत असल्याचे त्यात मोठा घोटाळा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी वजन काटा सील करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या या सर्व घोटाळ्याची चौकशीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.