मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे शिवजयंती निमित्त जॉगिंग पार्क येथे गड-किल्ले बनविण्याची स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला. सर्व वर्गासाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेत ४० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी यात गड-किल्ले साकारले, विशेष म्हणजे उत्कृष्ठ ठरणा-या गड-किल्ल्याला २१ हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे दुसरे वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी शिवमुद्राचे महत्व, बाराबलुतेदारांचे महत्व अशा विविध महत्वांचे बॅनर लावण्यात आले. आज संध्याकाळ पर्यंत किल्ले बनविण्यात आल्यानंतर उद्या ते नागरीकांना बघण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आयोजकांनी माती व पाणी उपलब्ध करुन दिले आहे.