मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुंभारवाडा भागातील एका व्यापारी संकुलातील चॉकलेट, गोळ्यांच्या दुकानात गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या विशेष पथकाने छापा टाकत १ लाख ५७ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी रिझवान अहमद व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.