मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गिरणा साखर कारखान्यासाठी भाग भांडवल म्हणून शेतक-यांकडून जमा केलेले १६ कोटी २१ लाख ८ हजार ८०० रुपये परत मिळावे यासाठी उध्दव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी या प्रकरणाची १० दिवसात चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दाभाडी येथील गिरणा कारखाना अवसायानात निघालेला असतांना गिरणा बचाव समिती स्थापन करत गिरणा-मोसम शुगर अँग्रो अँण्ड अलाइड इंडस्टिरीज लिमिटेड ही कंपनी स्थापन करुन जिल्हयातील शेतक-यांकडून प्रत्येकी हजार ते अकराशे रुपये जमा केल्याचे त्यांनी यावेळी निवेदन देतांना सांगण्यात आले.