मालेगाव –केंद्रातील मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाशी कुठलेही देणेघेणे नसून पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. या महागाईस भाजप सरकारच जबाबदार असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी केला आहे.
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या नेतृत्वाने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पवार, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, डॉ.जयंत पवार, राजेंद्र भोसले, अरुण देवरे, राजेंद्र जाधव, यशवंत शिरसाट आदींची भाषणे झाली. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावेत अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप पवार यांनी यावेळी केली.
एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या. यासोबतच पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चा मध्ये जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप पवार, युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, गिरणा सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन विजय रामजी पवार, मालेगाव मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ. जयंत पवार, माजी संचालक अरुण देवरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंत शिरसाट, ग्रंथालय सेलचे अध्यक्ष विजय पवार, सेवादल विभागाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, विनोद शेलार, गुलाबराव चव्हाण, प्रकाश वाघ, अशोक पवार, रतन हलवर, सलीम रिझवी, प्रफुल्ल पवार, अरुण आहेर, प्रशांत पवार, बाळासाहेब वाणी, संदीप अहिरे, अशोक निकम, किशोर इंगळे, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, सटाणा शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, योगेश पाटील, सम्राट काकडे, दत्ता वाघचौरे, दिनेश ठाकरे, किशोर ह्याळीज, सचिन शिंदे, बबन पवार, सुमित निकम, आशिष निकम, विश्वास पवार, सुनील पवार, सतीश पवार, भगवान माळी, प्रशांत पाटील, आनंदा अहिरे, डॉ. रेहमान मुझीब, हेमलता मानकर, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, वर्षा लिंगायत, निलिमा काळे, वैशाली मोरे, आशा काकळीज, ज्योती नंदन, अरुणा नंदन, दिपाबाई चौधरी, मंगलबाई मानकर, प्रतिभा घरटे, विमल नंदन, संदीप गोतरणे, नवनाथ शिल्लक, सनी निकम, भानुदास चोरगे, आबा साळुंके, अनिल निकम, जितु निकम, हबीबभाई शेख, आकाश भामरे, प्रणव अमोणकर, योगेश बागुल, शुभम खैरनार आदी उपस्थित होते.
बहुत हुई मेहंगाई की मार घोषणा देणारे कुठे
केंद्रातील मोदी सरकारमुळेच पेट्रोलने प्रति लिटरला किंमतीचे शतक पार केले असून डिझेल देखील शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेफार वाढले की, बहुत हुई मेहंगाई कि मार… अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव १०४ रुपये तर डिझेलचे भाव ९६ रुपये प्रति लिटर झाले तरी शांत का असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलतांना केला.
त्या काकू कुठे गेल्या
२०१४ च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी घरगुती गॅसचे भाव वाढल्यावर टीव्हीवर येऊन गृहिणीचे बजेट कोलमडल्याचे ओरडून सांगणाऱ्या त्या काकू आता गॅसचे दर ८१३ रुपये इतके झाले तरी त्या अजून टिव्हीवर दिसत नाहीत. त्या काकू कुठे गेल्या ते शोधावे लागेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी म्हटले आहे.