मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील आझाद नगर परिसरातील गुलशनाबाद परिसरात एक तरुण शिकार केलेल्या हरणाचे मास विक्री करण्याच्या उद्देशाने आला असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक तेगबहादूर सिंग यांना मिळताच त्यांनी छापा टाकत हरण्याच्या मासासह एकाला अटक केली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हरीण मारल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. पोलिस याचा तपास करीत असताना, मिळालेल्या माहितीच्या आधारे खुद्द पोलिस उपअधीक्षक तेगबहाद्दूर सिंग यांनी पथकासह हरणाची शिकार करत त्याची मास विक्री करणाऱ्याला साहित्यासह ताब्यात घेतले. यावेळी वनविभागाचे पथक त्यांच्या मदतीला आले होते. आरोपीला ताब्यात घेतले त्यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मालेगाव परिसरात तसेच बाजूच्या नांदगाव, येवला येथे हरणांची मोठी संख्या आहे. त्यामुळे हरणांची शिकार करण्याच्या काही घटना यापूर्वी सुध्दा समोर आल्या आहे.