मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील कॅम्प रोडवरील सेंट्रल बँकेत सकाळी सातच्या दरम्यान आगीची घटना घडली. बँकेच्या संगणक प्रणालीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने मोठा धूर झाला. याची माहिती बँकेच्या अधिकारी, सुरक्षा रक्षक यांना समजताच त्यांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अग्निशमन दलाची गाडी तेथे येऊन पोहचल्यावर तासाभरात त्यावर नियंत्रण मिळविण्यात आले. यात मात्र संगणक, बॅट-या आदी वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून बँक आज बंद ठेवण्यात आली आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1605454524252315648?s=20&t=apXxivYZPnV_NtaL9_JtnQ