मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई पाठोपाठ नाशिकच्या मालेगावमध्ये लहान बालकांना गोवरची लागण झाल्याच समोर आले असून आता पर्यंत ४४ बालकांना गोवरची लागण झाली आहे. अनेक बालकांवर महापालिकेच्या अन्य रुग्णालयात उपचार करण्यात येताय तर दोन रुग्ण सामान्य शासकीय रुग्णालयात उपचार घेतात. बालकांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. लसीकरणाची अनास्था असल्याने अनेक बालकांना गोवरची लस दिलेली नसल्याच निदर्शनात आले असून ९ ते १८ महिन्याच्या बालकांना गोवरची लस देण्याच आवाहन महापालिका आयुक्तांनी केले.