मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील धारातीर्थ भुईकोट किल्ल्यावर प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करीत मंगलमय वातावरणात दीपोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी किल्ल्याच्या तटावर लेझर शो देखील ठेवण्यात आला असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. अनेक नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह दीपोत्सवाच्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला. शहराच्या मध्यवर्ती असलेला हा किल्ला हजारो पणत्यांनी उजळून निघाला होता. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आल, यावेळी गडाची गाथा सांगणारी चित्रफीत देखील दाखवण्यात आली.