मालेगाव – मालेगाव-झोडगे रस्त्यावरील चाळीसगाव चौफुलीनजीक असलेले दोन मजल्याच्या एकता हॉटेलचा स्लॅब शनिवारी (दि.२९) कोसळल्याची घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घडली. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच मालेगाव अग्निशमन विभाग, ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. दरम्यान, या हॉटेलमध्ये ग्राहकांसह, कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शीकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, हॉटेलमध्ये किती नागरिक आहेत. त्यांना मागच्या बाजूने बाहेर पडता आले आहे का? याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. जेसीपीच्या साह्याने मदत काम चालू आहे. अद्याप जखमींची संख्या समजू शकली नाही. घटनेची माहिती कळताच राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देत स्वतः पाहणी केली. पाऊस व वादळ असल्यामुळे हॉटेलात भरपूर गर्दी असल्याचे समजते.