अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगावमध्ये पोलीस परेड ग्राउंडवर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच राजू मोरे याने अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मोरे हे प्रशासनाला सीसीटीव्ही, कॅमेरे पुरवण्याचे काम करतात त्यापोटी बिल बाकी आहे. या कामाचे अद्याप पैसे मिळाले नसल्याने त्यांनी ध्वजारोहण होण्यापूर्वी आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित पोलिसांच्या हे लक्षात येताच त्यांनी त्यास पकडून ताब्यात घेतले.