अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर मुंबई बरोबर मालेगांव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने शहरातील मोसमपुल महात्मा गांधी पुतळ्याजवळ या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. ही कारवाई सुडबुध्दीने ईडीकडून करत असल्याने संतप्त शिवसैनिकांकडून घोषणा बाजी केली. त्यानंतर निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद शुक्ला, उपजिल्हा प्रमुख रामा मिस्तरी, महानगर प्रमुख राजाराम जाधव, कैलास तिसगे ,जितेंद्र देसले ,दिनेश पाटील यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल, ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा निषेध नोंदवण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, क्रांती पाटील, अनिल पवार, दत्तू गवळी, गंगाधर जाधव, अजय जगताप, नंदू पाटील, यशवंत मोरकर, विजय गवळी, वसईकर वकील, भीमा गवळी, बापू शिंदे, सुधा जोशी, अमोल चौधरी, संदीप अभोणकर, स्वप्नील श्रीवास्तव, कपिल परदेश, उद्धव पवार, भैया सोनार, राहुल जगताप, किशोर जाधव, शोयब खान, नाना शिदे युवा सेनेचे अर्जुन भाटी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.