अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
स्टंट बाजी करत नदीत उडी मारलेल्या तरुणाचा मृत देह चार दिवसानंतर सापडला आहे. मालेगाव येथे गिरणा नदीच्या पुलावरुन किल्ला परिसरात राहणा-या नईम मोहम्मद अमीन या २३ वर्षीय तरुणाने उडी मारली होती. त्याचा व्हिडीओही समोर आला होता. पण, उडी मारल्यानंतर मात्र या तरुणाचा मात्र अद्याप शोध लागलेला नव्हता. त्याचा तीन दिवसांपासून शोध घेतला जात असताना शहरा नजीकच्या सवदंगाव शिवारात झुडपात त्याचा मृत देह आढळून आला. या परिसरात रस्ते चिखलाने व रस्ते योग्य नसल्याने काही तरुणांनी चक्क दुचाकीवर त्याचा मृतदेह ठेवत सामान्य रुग्णालयात आणला. मृत देह दुचाकीवरून थेट रुग्णालयात आणल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.