अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
धुळे शहराजवळ असलेल्या मुंबई – आग्रा महामार्गाजवळ असलेल्या शंभर फुटी रोडजवळ आज बँर्निंग टॅंकरचा थरार घडला. या घटनेमुळे महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक साधारण एक तास ठप्प झाली होती. धुळे महानगर पालिकेच्या अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणल्यानंतर महामार्गावरच्या दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली. महामार्ग पोलीस तसेच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मुंबईकडून छत्तीसगडकडे कच्च तेल घेऊन जाणाऱ्या टॅंकरचा मागचा टायर दुपारच्या सुमारास फुटला. टायर फुटल्यानं टँकरला क्षणात आग लागली. टँकरमध्ये कच्चा तेल असल्यानं आग क्षणात भडकली. टॅंकरचा टायर फुटल्याचं चालक, क्लिनरच्या लक्षात येताच ते दोघेही तात्काळ टँकरच्या बाहेर आल्यानं मोठा अनर्थ टळला. धुळे महानगर पालिका, महामार्ग प्राधिकरणाच्या अशा दोघांच्या मिळून सहा बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवलं . कुलिंग पूर्ण झाल्यांनतर महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. महामार्ग पोलीस तसेच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं.