अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव तालूक्यात तळवाडे शिवारात झालेल्या जोरदार पावसाने ढगफुटी सदृष्य पावसाने हजेरी लावल्याने पिलकी नदीला पाणी वाढले. त्यातच गिरणा नदी मार्गे लेंडी धरणात पाणी पुरवठा सुरु असतांना अतिवृष्टी झाल्याने पाट फुटल्याची घटना घडली आहे. दरम्यान लेंडी धरणा जवळील पाटावरुन जात असतांना अचानक पाट फुटल्याने एक तरुण पाण्यात अडकल्याने स्थानिकांनी त्याला वाचविले आहे. सध्या चणकापूर धरणातून मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणा-या तळवाडे धरणात कालव्या द्रवारे पाणी सोडण्यात आले असून त्यातच त्याच परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याची घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसा नंतर नाशिक जिल्हयातील काही भागात पावसाने हजेरी लावली,संध्याकाळ्च्या सुमारास जिल्हयातील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले.