अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव येथे तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर दादा पगार हे आदिवासी बांधवांना घरपोच रेशनकार्ड मिळावे यासाठी गेले असता तहसिलदार हजर नव्हते. नायब तहसिलदार हजर असताना मात्र दिव्यांग बांधवांना अरेरावीची भाषा करत होते. त्यानंतर तेही निघून गेले. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी नायब तहसिलदाराची खुर्चीच उचलून घेतली. त्यानंतर त्यांनी आंदोलन केले. मालेगाव तालुक्यातील रोझाणे सिताणे, अंजदे सेड, कुळवाडी, पाळद, गिगाव, ऊमरदा, चिंचगव्हाण, येथील आदिवासी बांधवांनकडे पंधरा वीस वर्षांपासून रेषन कार्ड नाही रेशन कार्ड नसल्याने हे आंदोलन करण्यात आले.